Breaking News

ना नफा ना तोटा या तत्वावर डॉ.विजय मकासरे यांनी केली स्वखर्चातून अत्याधुनिक रुग्णवाहीका समाजाला अर्पण

राहुरी, दि. 29 - आरोग्याची समस्या धकाधकीच्या जीवनात सर्वत्र जाणवू लागली आहे मानवी जीवन हे क्षणार्धात नष्ट होवू लागले आहे आरोग्याच्या तक्रारी वाढताना दिसून येत आहेत या पार्श्‍वभूमीवर समाजातील गोरगरिब घटकांना आरोग्य समस्या त्वरित मिळाव्या या उदात्त व मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून नेहमीच सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होवून सदैव तत्पर असणारे निस्वार्थ निष्काम समाजाभिमुख कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट सामा.न्याय.विभागाचे प्रदेशाध्यक्ष  डॉ.विजय मकासरे यांनी सर्वसामान्य गोरगरिब जनतेकरिता एक स्वप्न उराशी बाळगले होते कि आजच्या युगात ना नफा ना तोटा या तत्वावर एक अत्याधुनिक रुग्णवाहीका समाजाला अर्पण करावयाची त्या स्वप्नाला अखेर नुकतेच सत्यात उतरवून डॉ.विजय मकासरे या अवलियाने स्वखर्चातून रुग्णवाहीका खरेदी केली व तीचे लोकार्पन नुकतेच करण्यात आले.
भूमाता ब्रिगेडच्या रणरागीणी तृप्ती देसाई या राहुरी शहरात दारुमुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी आल्या असता त्यांच्या हस्ते डॉ.मकासरे यांनी अत्याधुनिक रुग्णवाहीका समाजाला लोकार्पन केली ही रुग्णवाहीका ना नफा ना तोटा या नुसार अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असणार असून तातडीची आरोग्य सेवा पुरविण्यासाठी रुग्णवाहीकेचा समाजाला लाभ होणार आहे याकरिता मानवाधिकार असोसिएटच्या वतीने जारी करण्यात आलेल्या एका फोन कॉल्सवर ही रुग्णवाहीका संबंधित गरजू लोकांना उपलब्ध होणार आहे आजच्या घडीला आरोग्य व जीवन हा एक घडीचा डाव होवून बसले आहे त्यातच वाढते शहरिकरण व लोकसंख्या याच्या प्रमाणात सर्वांना तातडीची आरोग्यसेवा मिळणे हे जिकरीचे होवून बसालेले आहे अनेकदा रुग्णवाहीका या तातडीने उपलब्ध होत नाहीत त्यामुळे अनेकदा रुग्णाच्या जीवावर बेतण्याचे प्रसंग उद्भवतात हे डॉ,मकासरे यांनी अनेकदा अनुभवले आहे..रस्त्यावरील अनेक अपघात ग्रस्तांना उचलून स्वताच्या गाडीमध्ये टाकून रुग्णालयात नेऊन त्यांचे प्राण वाचवन्याचे पुण्याचे काम डॉ विजय मकासरे यांनीअनेकदा केले आहे..रुग्नवाहिकेची गरज ओळखून  गोरगरिब व सर्वच घटकांसाठी अत्याधुनिक रुग्णवाहीकेचे स्वप्न  त्यांनी सत्यात उतरवत समाजहीतासाठी रुग्णवाहीका लोकार्पन सोहळा नुकताच दारुमुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या दिनी तृप्ती देसाई यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न केला..रुग्णवाहिकेसाठी संपर्क क्रमांक..9763 777 156..9881 888 414 हे दोन क्रंमाक डॉ विजय मकासरे यांनी उपलब्ध करन दिले आहेत.