Breaking News

आपत्तीजन्य परिस्थितीत विम्याचा मोठा आधार-शंकरराव कोल्हे

कोपरगाव, दि. 29 - संजीवनी साखर कारखान्यांने सभासद व कर्मचा-यांच्या हितासाठी न्यु इंडिया इंषुरन्स कंपनीकडुन ग्रुप अपघात विमा उतरविला असून आपत्तीजन्य परिस्थितीत या विम्याचा मोठा आधार लाभतो असे प्रतिपादन अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
कारखान्यांचे कर्मचारी जीभाउ ओकांर खोमणे यांचे अपघाती निधन झाले असता त्यांच्या वारस पत्नी श्रीमती रूक्मीणीबाई जीभाउ खोमणे यांना न्यु इंडिया इंषुरन्स कंपनीकडुन एक लाख रूपयाचा अपघाती विमा धनादेष संस्थापक माजीमंत्री षंकरराव कोल्हे यांच्या हस्ते बुधवारी देण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते.  याप्रसंगी कारखान्यांचे उपाध्यक्ष षिवाजीराव वक्ते संचालक सोपानराव पानगव्हाणे आप्पासाहेब दवंगे प्रकाष खोमणे आदि उपस्थित होते. प्रारंभी प्रभारी कार्यकारी संचालक षिवाजीराव दिवटे यांनी प्रास्तविक करतांना सांगितले की माजीमंत्री षंकरराव कोल्हे यांच्या दुरदृश्टी विचारातुन कारखान्यांने न्यु इंडिया इंषुरन्स कंपनीच्या सहकार्यांने सभासद व कर्मचा-यांसाठी ग्रुप जनता अपघात विमा योजना घेतली होती त्यामाध्यमांतुन असंख्य सभासद व कामगारांच्या वारसांना त्याचा लाभ मिळाला आहे.
बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणांले की अपघात कधी आणि केंव्हा कुठे होईल याचा आज भरवसा राहिलेला नाही. भारतात विमा घेणांरे ग्राहक कमी आहेत मात्र परदेषात आपण त्यांच्या भुमीवर पाउल ठेवताच जाणीवपुर्वक विमा उतरवा लागतो. अलिकडेच कारखान्यांच्या कर्मचा-यांची मेडीक्लेम पॉलीसी घेण्यांत असुन त्यातुन गंभीर आजार उपचार षस्त्रक्रियेसाठी पती पत्नी व दोन मुले यांना वर्शभरात दोन लाख रूपयापर्यंत ठरावीक रूग्णालयासाठी सहाय मिळणार आहे. तेंव्हा प्रत्येकांने विमा ही काळाची गरज समजुन तो उतरविलाच पाहिजे. षेवटी कामगार कल्याण अधिकारी एस सी चिने यांनी आभार मानले.