Breaking News

नवलेवस्ती शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

संगमनेर (प्रतिनिधी), दि. 29 - तालुक्यातील घुलेवाडी येथील नवले वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोले एज्युकेशनचे उपाध्यक्ष एम. डी. सोनवणे होते.
विद्यार्थी व शिक्षक शिक्षक यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध झाल्याचे मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थी भावनिक झाले होतेा. विद्यार्थ्यांनी श्ळेला चांगल्या स्वरुपाच्या भेट वस्तु दिल्या. शाळेला लाभलेले शिक्षक म्हणजे चौरंगी हिरे असल्याचे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले.
पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. रोहिणी गुंजाळ यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. विलास दादाभाऊ नवले यांच्याकडून यावेळी मिष्टान्न देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब राऊत, सुनिल राऊत, रोहिणी गुंजाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक नवले, भारत नवले, भास्कर राहाणे, गोरख शिरतार, हेंमत पांडे, भास्कर मोहिते, शिक्षण विस्तार अधिकारी के. के. पवार, केंद्रप्रमुख शिवनाथ पारधी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक किशोर बिडवे यांनी केले. आभार श्री. बंड रांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती शितोळे, वंदना नवले, हौशाबाई शिरतार, सुंदराबाई मेंगाळ, विजय गायकवाड, बावीसकर, देवीदास नवले, श्री. गोडे आदींनी प्रयत्न केले.