Breaking News

चळवळीचा श्‍वास मोकळा करायचा आहे... पण!

दि. 27, एप्रिल - दगडधोंड्यांचा ,गड किल्यांचा साधु  संतांचा हा महाराष्ट्र...छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याला पुरोगामी विचारांची भक्कम तटबंदी बांधणारे म. फुले, राजश्री शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचा हा महाराष्ट्र... बारा बलुतेदार आठरा पगड बहुजनांचा हा महाराष्ट्र तोडण्याची सुपारी घेणारे दलाल सर्वच समाजाच्या बीळात दडले आहेत.कोण आहेत हे दलाल? काय कुट शिजवले त्यांनी? बहुजनांच्या ऐक्याला जातीय मतभेदांचा सुरूंग लावणारे सुपारीखोर कोण? त्यांच्या नाकात वेसण कोण घालणार? य सर्व प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न... लवकरच अ‍ॅड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर,पुरूषोत्तम खेडेकर, म. ना. कांबळे यांच्या सारख्या समाज अभ्यासकांची मॅरेथान मुलाखत...
पुरोगामी चळवळीचे अधिष्ठान असलेला महाराष्ट्र समाज गेल्या काही काळापासून प्रदुषित झाल्याचे चिञ दिसते आहे. महाराष्ट्र समाज प्रदुषित झाला म्हणजे नक्की काय यावर अनेक मत मतांतरे असु शकतात, केवळ संख्येने नव्हे तर जात पंथ, धर्म, संस्कृती, रूढी परंपरा या सर्वच पार्श्‍वभुमीवर समाजमन मोठ आहे. महापुरूषांच्या, संतांच्या शिकवणुकीचा परिपाक म्हणून हे राज्य भारतच नव्हे तर विश्‍वाच्या पाठीवर सुधारणावादी राष्ट्र म्हणून परिचीत आहे. या मातीत जन्माला आलेला प्रत्येक सुधारणावादी विचार जगाने अंमलात आणून उत्कर्ष साधला आहे.
ही अतिशयोक्ती नाही. हे वास्तव आमच्या लक्षात येत नाही म्हणून जग वारंवार आठवण करून देतांना दिसते. छञपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, राजे सयाजीराव गायकवाड यांच्या सामाजिक राजकीय कर्तृत्वाची उदाहरणं देऊन पाश्‍चिमात्य राज्यकर्ते हे सुपुञ त्यांच्या मातीत जन्मले असते तर ....अशा प्रकारचा आशावाद बोलून दाखवितात,यातच या महानुभवांच्या कार्याची महती स्पष्ट होते.
अशा महापुरूषांना जन्म देणार्‍या याच मातीचा वारसा सांगणारा महाराष्ट्र समाज आज अंधारात चाचपडतांना दिसतो. या महापुरूषांनी दिलेला सर्व समावेशक, सामाजिक न्याय, समतेचा विचार काही मंडळींच्या आत्मकेंद्रीता  ‘स्व’ च्या बाधेने पछाडला गेल्याने एकूण सामाजिक चळवळच अहंकाराच्या विषाणुने पोखरली आहे.
राजकारण आणि समाजकारणाच्या सीमेवर बसलेल्या दलालांच्या विळख्यात अवघी चळवळ गुदमरू लागली आहे.
या अवस्थेतून चळवळ बाहेर काढणे आवश्यकता चळवळीत काम करणार्या प्रामाणिक कार्यर्त्यांना वाटते, तशी इच्छा या मंडळींनी लोकमंथनकडे व्यक्तही केली आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन चौफेर विकास साधत समाजाच्या पदरात समान न्याय टाकण्याची कुवत असलेल्या या नेत्यांची तळमळ खरोखर उल्लेखनिय आहे.
अशा या नेता असूनही स्वतःला कार्यकर्ता मानणारे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, पुरूषोत्तम खेडेकर, म. ना, कांबळे, प्रा. जोगेंद्र कवाडे, चंद्रकांत हांडोरे प्रविण गायकवाड अशा मंडळींच्या मनातली चळवळ सोमवारपासून समाजाच्या  कट्ट्यावर मांडणार आहोत.