Breaking News

चप्पल दुकानाला आग ; लाखो रुपयांचा माल जळाला

अहमदनगर, दि. 25 - कर्जत तालुक्यातील बाभुळगांव खा येथे चप्पल दुकानाला अचानक आग लागल्याने या आगिमध्ये लाखोंचा माल जळुन खाक झाला आहे. 
मिरजगांवपासून जवळच असणारे बाभुळगांव खा. येथिल रहीवासी तुकाराम दादासाहेब बुध्दीवंत यांनी गेल्या वर्षी मिरजगांव येथिल बँक ऑफ महाराष्ट्रचे मुद्रा लोन घेवुन चप्पल व्यवसाय सुरु केला याच व्यावसायावर आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह चालवत होते. त्यामुळे तुकाराम बुध्दीवंत हा तालुक्यातील असणारे सर्व आठवडे बाजार येथे आपल्या व्यवसाय रस्त्याच्या कडेला लावुन चप्पल विकण्याचे काम करत होता. भांडवल जमत जमवत त्यांनी श्री गणेश फुट वेअर नावाने नगर - सोलापुर महामार्गावर बाभुळगाव खा येथिल बस थांब्या जवळ व्यवसाय सुरु केला. येथेच आज आग लागल्याने मोठे नुसाकर झाले. तसेच सध्या यात्रा उत्सव काळ असल्याने त्यांनी आपली संपुर्ण पुंजी या व्यवसायासाठी लावली होती. परंतु आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत त्यांचे संपुर्ण नुकसान झाले असुन त्यांचा व्यवसाय बसला आहे.
प्रथम त्यांच्या दुकानामागील वृक्ष असल्याने तेथे काही पाला पाचोळा पेटवला असल्याचे चित्र दिसत होते परंतु उन्हाचा तडाखा आणि वार्‍याच्या वेगाने आग अचानक भडकली आणि या मध्ये सर्व आगीमध्ये भस्मसाद झाले आहे. वडाच्या वृक्षाला खेटूनच लाकडी टपरी असल्याने आग भडकत गेली यामध्ये संपुर्ण दुकानच उध्वस्त झाले. तसेच यात्रेमधील नागरी या ठिकाणी येवु लागले मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या आगीत रोख 60 हजार तर 30 हजार रुपयांचे फर्निचर जळुन खाक झाले आहे.