गायत्री प्रजापती यांच्याबाबतचा स्थिती अहवाल सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सादर
नवी दिल्ली, दि. 25 - सामुहिक बलात्काराचेव उत्तर प्रदेशचे माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्याबाबतचा स्थिती अहवाल उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केला. सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, या प्रकरणी प्रजापती यांच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याबाबतची सुनावणी तुर्तास थांबवायला हवी. स्थिती अहवालाची प्रत पीडितेलाही देण्याचे आदेश यावेळी न्यायालयाने दिले.
आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पीडितेने न्यायालयाकडे संरक्षण प्रदान करण्याची मागणी केली. त्यावर याबाबत संबंधीत अधिका-यांना निवेदन दिल्यास ते निर्णय घेतील असे न्यायालयाने सांगितले. प्रजापती यांच्या विरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करून त्यांच्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 17 फेब्रुवारी रोजी दिले होते.