Breaking News

रिलायन्सला उद्योग समुहाला चौथ्या तिमाहीत 12.3 टक्के निव्वळ नफा

नवी दिल्ली, दि. 25 - रिलायन्स उद्योग समुहाला या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत 12.3 टक्के निव्वळ नफा झाल्याचे कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. 
जानेवारी ते मार्च या आर्थिक वर्षाच्या चौथ्या म्हणजेच अखेरच्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 8,046 कोटी रुपयांवर गेला आहे. गेल्या वर्षी याच काळात हा नफा 7,167 कोटी रुपये होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीला 12.3 टक्के निव्वळ नफा मिळाला आहे, असे कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात कंपनीला 29,901 कोटींचा नफा झाला आहे, जो आत्तापर्यंतचा सर्वाधिक नफा आहे. हे आर्थिक वर्ष रिलायन्स उद्योग समुहाचे तेल शुद्धीकरण प्रक्रिया क्षेत्रातील ऐतिहासिक वर्ष असल्याचे मुख्य वित्त अधिकारी आलोक अग्रवाल यांनी सांगितले. रिलायन्सने कच्च्या तेलाचे पेट्रोलमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत प्रति पिंपामागे 11.5 डॉलरची कमाई केली. गेल्या वर्षी हीच कमाई 10.8 प्रति पिंप होती, असे ते म्हणाले.