आगग्रस्त कुटूंबांना सानुगृह मदतीचे वितरण
बुलडाणा, दि. 05 - येथून जवळच असलेल्या भोसा येथे सहा दिवसांपूर्वी आग लागून 4 कुटुंबाचे लाखोंचे नुकसान झाले होते. त्यामधील आगग्रस्त कुटूंबास आज सानुग्रह अनुदानाचे धनादेशाचे वितरण आमदार डॉ.संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
29 मार्च रोजी मोझा येथे भिषण आग लागून एकंदरीत चार घरे जळाली होती. त्यामध्ये एक गोर्हाचा जळून मृत्यू झाला होता. धन्य व साहित्य जळून जवळपास 18 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. चार कुटूंब पुर्णतः बेघर झाली होती. त्या बेघर झालेल्या कुटूंबास अनुक्रमे देवकाबाई आत्माराम मोघाड 11 हजार, तुळशीराम बंडु मोधाड 11 हजार, संजय करवते 16 हजार, गणेश मोधाड 8550, विजय मोधाड 10 हजार 650 रुपयांचे सानुगृह अनुदानाचे धनादेश आ.डॉ.संजय रायमुलकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष काकडे, पं.स.सभापती जयाताई खंडारे, केशवराव खुरद, सरपंच निता चवरे, समाधान साबळे, शेषराव चव्हाण, पोलीस पाटील उत्तम मोधाड, जगदेव खुरद यांच्यासह बहूसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.