Breaking News

निगडी खून प्रकरणातील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

पुणे, दि. 18 -  पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने आणि तिच्या आई-वडिलांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. निगडी यमुनानगर येथे कौंतेय  सोसायटी समोरील रस्त्यावर शनिवारी (दि. 15) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी निगडी पोलिसांनी पत्नी, सासू आणि सास-याला अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पेत्रस जॉन मनतोडे (वय 29, रा. स्कीम नं. 10, रुम नं. 2, कौंतेय सोसायटी, यमुनानगर, ओटा स्कीम, निगडी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी क्रिस्टीना पेत्रस मनतोडे (वय 28), सासू लुसीया सूर्यकांत बोर्डे (वय 55), सासरा सुर्यकांत संतोष बोर्डे (वय 58) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून अमोल भादु साळुंके यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.