राज्यमंत्री विजय शिवतारे यांची टेमघर धरणाला भेट
पुणे, दि. 18 - टेमघर धरणाच्या गळती रोखण्याचे काम तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. धरणातून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी ड्रिलींग आणि ग्राऊटींगचे पहिल्या टप्प्यातील काम वेगाने सुरू असून धरणावर सुरू असणार्या कामाला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज भेट दिली. धरणावरील कामाची पाहणी करुन त्यांनी कामासंबंधी अधिकार्यांना सूचना दिल्या.
यावेळी मुख्य अभियंता टी.एन. मुंडे, अधिक्षक अभियंता एच. टी. धुमाळ, कार्यकारी अभियंता सुनिल प्रदक्षिणे, उपविभागीय अभियंता वाय. के. चौगुले, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 मकरंद मॅकल, तहसिदार सचिन डोंगरे उपस्थित होते.
टेमघर धरणातून होणारी पाण्याची गळती कमी करण्यासाठी व धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी तीन टप्प्यात काम करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ड्रिलींग आणि ग्राऊंटींग करण्यात येणार आहे. या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू असून येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच दुसर्या टप्प्यात पीआयसीसी (पॉली आयराईट सिरॅमिक सिमेंट ने प्लॅस्टर) करण्यात येणार आहे. तर तिसर्या टप्प्यात धरणाच्या मोनोलिथ क्रमांक 9 ते 17 ला पूर्णपणे सिमेंटचे अस्तरीकरण करण्यात येणार आहे.
या तीन टप्प्यात होणार्या कामांतर्गत धरणाच्या अर्ध्व व अधो बाजूकडील भराव काढणे, उर्ध्व बाजूकडील मोठी छिद्रे संधानकाने भरणे ग्राऊंटींग करणे, धरण भिंतीत धरण माथ्यावरुन व पहाणी गॅलरीमधून ग्राऊंटींग करणे, धरण पाया गॅलरीत कर्टन ग्राऊंटींग करणे, धरणातील पोरस पाईप स्वच्छ करणे, ड्रेन होल्स स्वच्छ करणे, उर्ध्व बाजूकडील पृष्ठभाग संकल्पचित्राप्रमाणे करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
टेमघर धरणाच्या प्रत्यक्ष पहाणीसाठी जाण्यापूर्वी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अधिकार्यांची टेमघर धरणाच्या परिसरात असणार्या कार्यालयात बैठक घेवून कामाच्या सद्य स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी धरणाच्या भिंतीवर सुरु असणार्या ड्रिलींग आणि ग्राऊटींगच्या कामाची प्रत्यक्ष पहाणी केली. कामाच्या तंत्रज्ञानाविषयी व दर्जाविषयी माहिती घेतली. पावसाळा सुरू होण्याच्या आधी अधिकाधिक काम पूर्ण करण्याच्या सूचना श्री. शिवतारे यांनी अधिकार्यांना आणि ठेकेदारांना दिल्या.