भाजप आणि सेनेच्या रामनवमीच्या वेगवेगळ्या मिरवणूका
अहमदनगर, दि. 05 - पवननगर, भिस्तबाग येथील श्रीराम समितीच्या वतीने रामनवमीच्या पुर्वसंध्येला प्रभु श्रीरामाच्या उत्सव मुर्तीची भव्य पालखी मिरवणुक काढण्यात आली होती. श्रीराम हनुमान मंदिरात सायंकाळी 6 वाजता प्रभु श्रीरामांच्या पालखीचे पुजन श्रीराम सेवा समितीचे कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ती पालखी खांद्यावर घेवुन मंदिराबाहेर आणण्यात आली. ‘प्रभु श्रीरामचंद्र की जय’ अशा जयघोषात हि पालखी मिरवणुक पवननगर परिसरातील प्रशांत भालेराव यांच्या निवासस्थानी आली. येथे रामराव भालेराव व कुटूंबियांनी प्रभु श्रीरामाच्या उत्सव मुर्तीचे विधीवत पुजन केले. राकेश भणगे यांनी मंत्रोच्चारात पौरोहित्य केले. त्यानंतर हि पालखी मिरवणुकीसाठी रवाना झाली.
परिसरातील श्रीराम भक्तांनी या पालखी मिवरणुकीचे मोठ्या भक्तीभावाने स्वागत केले. मिरवणुक मार्गावर रस्त्यांच्या दुर्तफा महिलांनी सडा संमार्जन करुन सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. तुतारीचा निनाद, अब्दागिरीचा डौल, पालखीवरील छत्र, बॅण्ड पथक, वारकरी दिंडी, भगव्या पताका, शंखध्वनी, सोबतच जय मृंदग वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, महिला भजनी मंडळ तसेच परिसरातील श्रीराम भक्त टाळ मृदंगाच्या तालावर अभंग व श्रीरामाची गाणी गात पावली खेळत हि मिरवणुक पुढे जात होती. रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या लाकडी पालखीमध्ये प्रभु श्रीरामाची आकर्षक उत्सव मुर्ती ठेवण्यात आली होती. मिरवणुक मार्गावर अनेक महिलांनी पालखीतील प्रभु श्रीरामाच्या उत्सव मुर्तीचे औक्षण करुन दर्शन घेतले व पालखी पुजन केले. मिरवणुकी मार्गावर आकाशात रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. पवन नगर, भिस्तबाग रोड, महाराजा गपणती मंदिर, गोकुळ नगर, नंदनवननगर, दत्तनगर, तुळजानगर, साईराम नगर, कुशाबानगरी मार्गे हि पालखी मिरवणुक विठ्ठल रुक्मीणी मंदिरात पोहचली तेथे विठ्ठालाची आरती झाल्यानंतर हि पालखी विसर्जनासाठी पुन्हा पवननगर मधील श्रीराम मंदिराकडे रवाना झाली. श्रीराम सेवा समितीचे अध्यक्ष प्रशांत भालेराव व कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली भाविकांनी शिस्तबद्ध पालखी मिरवणुकीसाठी परिश्रम घेतले.
भिंगार व शहरात विविध ठिकाणी विधिवत पुजन
भिंगार आणि शहर परिसरात मंगळवारी रामनवमी निमित्त शहरात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केले. भाजप व हिंदू राष्ट्र सेनेने एकत्रित काढलेल्या मिरवणूकचा मार्ग यावेळी आशाटॉकीज चौक वगळून चांद सुलताना मार्गे करण्यात आला होता. शिवसेनेची मिरणुक ही रामचंद्रखुंट येथुन सुरु करण्यात आली होती तर सायंकाळी चारच्या सुमारास भाजप व हिंदूराष्ट्रसेना पुरस्कृत मिरणुक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मिरणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुक नेतासुभाष चौकात आल्यानंतर किरकोळ आपसातील वाद निर्माण झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करुन वातावरण शांत केले. यावेळी युवकांची मोठी गर्दी या मिरणुकीत पहावयास मिळाली.
मंगळवारी विविध ठिकाणी युवकांनी चौक सजावट केली होती. शहरातील रस्ते रांगोळ्यांनी सजले होते. तर शहरातील हिंदू राष्ट्र सेना, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वतंत्र मिरणुकीचे अयोजन करण्यात आले होते. शहरात सकाळपासूनच जय श्री रामचंद्र प्रभुचे ध्वनी कानावर पडत होते. शहरातील हिंदू राष्ट्र सेनेने शहरातील विविध चौका - चौकात रामनवमी निमित्त मोठे मोठे फ्लेक्स लावलेले दिसत होते. जय श्री राम तसेच शहरातील रस्त्या रस्त्यावर भगव्या पतका व झेंडे लावण्यात आले होते. यावेळी एसआरपीच्या बंदोबस्तासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.