Breaking News

शिवसेना खा. आनंदराव अडसूळ संसदेत आक्रमक

नवी दिल्ली, दि. 05 - शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानबंदी अद्यापही कायम आहे. याप्रकरणी शिवसेना खासदारांनी एअर इंडिया आणि विमान कंपन्यांवर हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. मात्र, या संपूर्ण प्रकारावर सरकारनं दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे या प्रकरणावर आज शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी लोकसभेत आवाज उठवला.
रवींद्र गायकवाड यांच्या प्रश्‍नासंबंधी आज आनंदराव अडसूळ यांनी सरकारला इशारा दिला. ‘आम्हीपण हंगामा करू शकतो, त्यामुळे या प्रकरणाकडे तातडीनं लक्ष  द्यावं.’ असं म्हणत आनंदराव अडसूळ यांनी आपला संताप व्यक्त केला. शिवसेनेनं मांडलेल्या हक्कभंग प्रस्तावाकडे आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात आल्यानं सेना  खासदार आता आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.
एअर इंडियाने खासदारांवर गुन्हा दाखल केला. पण सर्वच विमान कंपन्यांनी बंदी घालणे चुकीचे आहे. संविधानानुसार कुठेही प्रवास करता येतो. बंदी घालणे हे  आपल्या हक्कापासून वंचित करणे आहे. माझी अपेक्षा आहे की, सर्व खासदार सहकार्य करतील. अध्यक्षांनी सरकारला निर्देश द्यावे, कपिल शर्मा यांनी मारहाण  केली परंतु त्यावर चौकशी सुरु आहे. नागरी उड्डाणमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. विमान कंपन्यांनी बंदी उठवावी, असं म्हणत अडसूळ यांनी विमान कंपन्यांविरोधात  हक्कभंग दाखल केला होता.