Breaking News

चळवळीतील भाडोत्री दलालांना चपराक द्यायची असेल तर..

दि. 29, एप्रिल - दगडधोंड्यांचा ,गड किल्यांचा साधु  संतांचा हा महाराष्ट्र...छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याला पुरोगामी विचारांची भक्कम तटबंदी बांधणारे म. फुले, राजश्री शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचा हा महाराष्ट्र... बारा बलुतेदार आठरा पगड बहुजनांचा हा महाराष्ट्र तोडण्याची सुपारी घेणारे दलाल सर्वच समाजाच्या बीळात दडले आहेत.कोण आहेत हे दलाल? काय कुट शिजवले त्यांनी? बहुजनांच्या ऐक्याला जातीय मतभेदांचा सुरूंग लावणारे सुपारीखोर कोण? त्यांच्या नाकात वेसण कोण घालणार? य सर्व प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न... लवकरच अ‍ॅड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर,पुरूषोत्तम खेडेकर, म. ना. कांबळे यांच्या सारख्या समाज अभ्यासकांची मॅरेथान मुलाखत...
मराठा समाजाला आरक्षण हव आहे,मग अडचण कुणाची...? मागासवर्ग समाजाची...इतर मागास वर्गीयांची? अजिबात नाही.मागासवर्गीय समाजाला अथवा इतर मागासवर्गीय समाजाला आपला घटनेने दिलेला हक्क अबाधित ठेवायचा आहे...मग तो हिरावून कोण घेतो आहे? आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून आक्रमक झालेला मराठा समाज...? तर अजिबात नाही.
मराठा ,मागासवर्गीय किंवा इतर मागास वर्गीय समाज एकमेकांच्या हक्काचं ओरबाडून घेण्यासाठी ना भुतकाळात प्रयत्नशिल होते ना वर्तमानकाळात ती मानसिकता आहे.हे सर्व घटक एकञ होते आणि आहेत.या सर्वांचा मिळून तयार झाला तो बहुजन ....या बहुजन समाजाच्या विकासासाठी संघर्ष करते ती बहुजन चळवळ.आपल्या पुर्वजांनी महापुरूषांच्या आदर्श विचारांसह ही चळवळ आपल्या स्वाधीन केली.माञ या चळवळीला राजकारणाचे भिरूड लागले आणि हळूहळू ही चळवळ पोखरली जाऊ लागली,एकसंघ बहुजन चळवळ खिळखिळी करण्यासाठी राजकीय पंडीतांनी खास एजन्ट चळवळीत पेरले.मराठा असोत नाहीतर मागास इतर मागास प्रवर्ग प्रत्येक समाजातील भ्रष्ट नितीमत्तेचे चेहरे या राजकीय पंडीतांचे हस्तक म्हणून चळवळीत शिरले आहेत.वैद्यकीय भाषेत बोलायचे झाले तर एचआयव्ही चा विषाणू शरीरात शिरल्यानंतर किमान आठ वर्ष लक्षात येत नाही.अनेकदा ज्याला तो बाधला त्या शरीराला हानीकारक न ठरता तो इतरांना बाधीत करण्याचे काम करतो.बहुजन चळवळीतही अशा प्रकारचे विषाणू शिरले आहेत.कार्यभार उरकेपर्यंत कुणाच्या लक्षातही आले नाही.आज माञ या विषाणूंनी आपला उद्देश सफलतेकडे नेल्याचे दिसते,अर्थात उशिरा का होईना ही बाब समाजाच्या लक्षात आली आहे.
प्रतिबंधात्मक उपाय करणे आपल्या हातात नाही हे खरे असले तरी हे विषाणू आहे तसेच नेस्तनाबूत करणे शक्य आहे.चळवळीच्या शरीरावर आलेल्या या कँन्सरच्या गाठी आहेत.त्यांच्यावर शस्रक्रीया करून चळवळीपासून त्यांना दूर करणे अत्यावश्यक आहे.
विद्यमान चळवळीत शिरकाव केलेल्या या बाजारबुणग्या जंतूना दूर केल्यानंतर निकोप समाजाची निकोप चळवळ उभी करणे हे मोठे आव्हान समाजासमोर आहे,त्यासाठी राजकारण्यांनी या भाडोञी एजन्टांकरवी समाजात निर्माण केलेली दुफळी आधी सांधावी लागणार आहे.बहुजन समाजातील प्रत्येक घटक एकमेकांच्या विरोधात नाही तर एकमेकांसाठी आहे.निसर्गाने व्यवहार रचनाच तशी केली आहे,हे लक्षात घेऊन एकमेकांच्या सुखदुखात सहभागी होत एकञीत चळवळ वाढविण्याचा संकल्प करण्याची वेळ आली आहे.आणि हीच खरी चळवळीतील भाडोञी दलालांना चपराक ठरणार आहे.