भरपूर वाचन केल्याशिवाय लेखन दर्जेदार होऊ शकत नाही - डॉ. अरुण मांडे
अहमदनगर, दि. 02 - ज्येष्ठ नागरिक मंच, सावेडी प्रकाशित ‘ज्येष्ठराज’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन साहित्यिक डॉ. अरुण मांडे यांच्या हस्ते जेष्ठ नागरिक सभागृह, गुरुकृपा सोसायटी, भिस्तबाग रोड येथे संपन्न झाले.
प्रकाशन प्रसंगी चंद्रशेखर करवंदे, चारुशीला करवंदे, मंचाच्या अध्यक्षा ज्योती केसकर, आदिनाथ जोशी, शिवप्रसाद जोशी, अशोक नवले, भास्कर देशपांडे, शरद कुलकर्णी, श्रीमती शुभदा कुलकर्णी, श्रीमती पुष्पा चितांबर, अविनाश कुलकर्णी, सर्वोत्तम क्षीरसागर, श्रीमती स्नेहल वेलणकर, अरविंद अनासपुरे व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
अरुण मांडे म्हणाले की, हल्ली वाचन खूप कमी होत आहे. भरपूर वाचन केल्याशिवाय लेखन दर्जेदार होऊ शकत नाही. प्रत्येकजण उत्तम लेखक असतोच, असे नाही पण प्रत्येकाच्या अंगी लेखकाचा गुण असतो व तो आपल्या कुवतीनुसार लिहित असतो. ज्येष्ठराज अंकामुळे ज्येष्ठांना आपले लेखन करण्याची संधी मिळाली आहे. गेली 25 वर्षे ज्येष्ठराज अंक प्रकाशित करत आहे, त्याबद्दल डॉ. मांडे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे कौतुक केले. ज्येष्ठराज अंकासाठी अशोक नवले यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक मंचाचे हे 25 वे वर्ष आहे. यापुढेही मंच ज्ञानवर्धक, मनोरंजक, उद्बोधनपर कार्यक्रम सादर करणार आहे, असे ज्योती केसकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.