Breaking News

पासपोर्टसाठी आता हिंदीतूनही अर्ज करता येणार!

नवी दिल्ली, दि. 23 - पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. कारण परराष्ट्र मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या एका तरतुदीनुसार पासपोर्टसाठी आता हिंदी भाषेतूनही अर्ज करता येईल. अधिकृत भाषा संसदीय समितीच्या नवव्या अहवालातील शिफारशी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. या समितीने 2011 साली हा अहवाल सरकारला दिला होता.
पासपोर्ट कार्यालयात हिंदी आणि इंग्रजी या दोन्हीही भाषांमध्ये अर्ज उपलब्ध असावा.हिंदीत भरलेला अर्ज स्वीकारला जावापासपोर्टवरील सर्व नोंदी हिंदीत असाव्यातपासपोर्ट आणि व्हीसासंबंधित माहितीही परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर हिंदीत असावीपासपोर्ट कार्यालयात हिंदीतून काम करण्याची परवानगी असावीपासपोर्ट कार्यालय आणि दूतावात हिंदी अधिकार्‍यांची नियुक्ती करावी
राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी या शिफारशींना मंजुरी दिली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता हिंदीतील अर्ज डाऊनलोड करुन अर्ज पासपोर्ट कार्यालयात जमा करता येईल. पासपोर्ट सेवा केंद्र आणि क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयात भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट स्वीकारली जाणार नाही. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यासोबतच भारतीय दूतावासामध्ये हिंदी अधिकार्‍याची नियुक्ती करण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच पासपोर्ट काढण्यासाठी आता आधार कार्डही जन्माचा दाखला म्हणून ग्रहित धरलं जाईल, असा अध्यादेश काढला होता. या निर्णयामुळेही पासपोर्ट प्रक्रिया सोपी होण्यास मदत झाली आहे.