Breaking News

काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

श्रीनगर, दि. 23 - जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाल्याचे वृत्त मिळत आहे. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले . बडगाम जिल्ह्यातील हयातपुरा भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळताच जवानांनी कारवाई सुरू केली. चकमक अद्यापही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या भागात काही दहशतवादी लपून बसले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.