शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी माजी आमदारांसह पंधरा जणांविरूद्ध गुन्हा दाखल
जळगाव, दि. 23 - सन 2008-09 मध्ये अल्पभूधारक शेतकरी नसताना महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या जवाहर विहीर योजनेचे खोटे कागदपत्र सादर करून शासनाची दिशाभूल करीत अनुदान लाटल्याप्रकरणी यावलचे माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांच्यासह माजी नगराध्यक्ष, पंस़चे माजी सभापती, उपसभापती व तत्कालीन तहसीलदार व विद्यमान निवासी उपजिल्हाधिकार्यांसह 15 जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला़
या बाबत यावल पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सन 2मध्ये गुलाम रसूल अ. नबी, हबीब गुलाम रसूल, राजेश माधवराव राणे यांनी अल्पभूधारक शेतकरी नसताना ग्रामीण भागातील शेतकर्यांसाठी राबविण्यात येणार्या महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजने अंतर्गत येणार्या जवाहर विहिर योजनेचा खोटे कागदपत्रे तयार करून लाभ घेतला. सदर योजना ग्रामीण भागातील शेतकर्यांसाठी असतांना शहरातील शेतकर्यांना लाभ देवून जी. आर प्रमाणे काम न करता पदाचा दुरूपयोग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला. संशयित आरोपींमध्ये माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, पंचायत समितीच्या माजी सभापती शोभा विलास पाटील, पंस़चे माजी उपसभापती हर्षल गोविंदा पाटील, माजी नगराध्यक्षा वंदना तुकाराम बारी यांच्यासह योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी गुलाम रसूल अऩबी, हबीब गुलाम रसूल, राजेश माधवराव राणे तसेच तत्कालीन गटविकास अधिकारी डॉ़. एकनाथ धनाजी लोहार, तत्कालीन तहसीलदार व विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, तत्कालीन तलाठी अग़नी शेख रहेमान, तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी एस़व्ही़ चौधरी, तत्कालीन उपविभाग अधिकारी सिंचन आर ओनारखेडे, पंचायत समितीचे शाखा अभियंता के.एस झोपे, ज़िप़ लघुसिंचन विभागाचे शाखा अभियंता ए.एस खडसे, सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी आर एन.महाजन (ज़िप़लघु सिंचन) यांचा समावेश आह़े. बाळासाहेब कोलते यांनी न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.