इगतपुरीजवळ नयनरम्य धबधबा; रॅपलिंग खेळाडुंची मांदियाळी
नाशिक, दि. 22 - बाहुबली चित्रपटात शोभेल असे काहीसे दृश्य तुम्हाला शहराजवळील इगतपुरीमध्ये बघायला मिळू शकते. उंच असा वाहणारा धबधबा आणि त्यावर रॅपलिंग करणारे साहसी खेळाडू आणि त्यांना प्रोत्साहन देणारे शेकडो पर्यटक येथे येतात.
इगतपुरी पासून 15 किलो मीटर अंतरावर असलेल्या विहिगावमध्ये आल्यावर या भव्य धबधब्याचे दर्शन होते. उत्तर महाराष्ट्राची पाँडेचेरी म्हणून इगतपुरीची ओळख आहे. हा भाग सहयाद्री पर्वत रांगानी वेढलेला असल्याने मोठ्या प्रमाणात येथे पाऊस होतो. म्हणून नाशिकसह मुबंईहुन पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात आणि साहसी खेळ असलेल्या रॅपलिंगचा आनंद घेतात.