Breaking News

यासिर शाहची अव्वल स्थानी झेप

लॉड्स, दि. 19 - इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानच्या दिमाखदार विजयात 10 बळींसह निर्णायक भूमिका बजावणार्‍या फिरकीपटू यासिर शाहने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेणारा यासिर 1996 नंतर पाकिस्तानचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. पाकिस्तानचे गोलंदाजीचे प्रशिक्षक मुश्ताक अहमद यांनी 1996मध्ये क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 10 बळी मिळवीत यासिरने क्रमवारीच्या 32 गुणांची कमाई केली.