बनावट नोटा प्रकरणातील आरोपीला संशयाचा फायदा, खंडपीठात निर्दोष मुक्त
औरंगाबाद, दि. 17 - बनावट नोटाप्रकरणात संशयाचा फायदा मिळाल्याने झारखंडमधील आरोपीला हायकोर्टाने निर्दोष मुक्त केले. झारखंड येथील नूर इस्लाम सादिक अली हा बनावट नोटाप्रकरणातील आरोपी आहे. कॅनॉट प्लेसमध्ये त्याने शिवम मोबाईल शॉपीचे मालक दिनेश महाले यांच्याकडे 100 रुपयांच्या मोबाईल रिचार्जसाठी एक हजार रुपयाची बनावट नोट दिली होती.याबाबत नूरने दिलेली नोट बनावट असल्याचा संशय आल्याने महाले यांनी बाजूचे दुकानदार राजू वेताळ यांना यासंबंधी विचारणा केली. त्यांचा संशय बळावल्याने त्यांनी सिडको पोलिसांना याची माहिती दिली. या महितीवरुन पोलीस निरीक्षक मारुती डब्बेवार हे पथकासह घटनास्थळी हजर झा
ले. त्यांनी आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 32 हजारांच्या नोटा, भिलाई ते मनमाड रेल्वे तिकिट सापडले. पोलिसांनी त्याला स्टेट बँक ऑॅफ इंडियाच्या शाखेत नेले. त्याठिकाणी शाखा व्यवस्थापकाने नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचा शेरा दिला. 29 सप्टेंबर 2011 रोजी ही घटना घडली.