Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीचा निवेदनातुन निषेध

बुलडाणा, दि. 23 -  पुर्णा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध दिलीप भिवाजी मुळे माजी तालुका अध्यक्ष भारिप बमस दे.राजा यांनी एका निवेदनातुन तलसिलदारामार्फत मुख्यमंत्र्यांकडे नोंदविला आहे.
दिलेल्या निवेनात नमुद करण्यात आले आहे की, पुर्णा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.आंबेडकर नगर येथून मिरवणुकीला सुरूवात झाली. मिरवणुक नियमांचे पालन करत सुरळीत पणे चालू होती. त्यावेळी काही समाजकंठकांनी व जातीवाद्यांनी उचानक दगड फेक करुन हल्ला चढविला. या हल्ल्यामध्ये 200 ते 300 महिला, पुरूष व बालक जखमी झाले. मिरवणुक विस्कळीत करण्यात आली. तसेच प्रतिमेची व गाड्यांची तोड फोड करुन जाळ पोळ करण्यात आली. सदर घटना अत्यंत निंदयीन असुन एकीकडे देशात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहे. आणि दुसरीकडे बाबासाहेबांचा घोर अपमान करत आहे. हे कृत्य करणार्‍या जातीयवाद्यांना तत्काळ अटक करावी अन्यथा आम्ही सर्व समाजाच्या वतीने व बहूजन वादी पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन, रास्ता रोको अशा प्रकारची तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या सर्व घटनेला शासन जबाबदार राहील. असेही निवेदनाअंती नमुद करण्यात आले आहे.