Breaking News

आरोपींमध्ये सुधार होण्यासाठी चेतना विकास व व्यवस्थापन तंत्र अवलंबण्याची मागणी

अहमदनगर, दि. 23 - आरोपींमध्ये सुधार होण्यासाठी चेतना विकास व व्यवस्थापन तंत्र अवलंबण्याची मागणी राष्ट्रीय न्यायाग्रह आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. तुरुंगाचे स्वरुप यातना भोगण्यासाठी मर्यादित न राहता, आरोपींना योग्य मार्गावर आनण्यासाठी या तंत्राचा वापर केला जाणार आहे. उन्नतचेतना राष्ट्रपिठाचा भाग होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.
ब्रिटीशांच्या कार्यकाळात असलेली कारागृहाची पध्दत स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देखील आज असतित्वात आहे. इंग्रज सरकार उलथवून टाकणार्या क्रांतीकारकांच्या मनात कायद्याची भिती निर्माण करण्यासाठी त्यांना कारागृहात डांबून मानसिक व शाररीक यातना दिल्या जात. स्वातंत्र्यानंतर आज मोठ्या प्रमाणात कारागृहावर खर्च येत आहे. कारागृहातून निघालेला आरोपी पुन्हा गुन्हा करतो. मात्र त्यांच्यामध्ये सुधार होण्याच्या दृष्टीकोनाने विचार केला जात नाही. आरोपींना कारागृहात ठेवून त्यांचे आयुष्य बर्बाद होत आहे. आरोपींची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केल्यास तो जीवनात चांगला नागरिक म्हणून राहू शकतो. भारतात अनेक वर्षापासून चेतना विकास व व्यवस्थापन तंत्र असतित्वात आहे. या तंत्राचा वापर आरोपींमध्ये सुधार होण्यासाठी होणार आहे. आरोपींसाठी चेतना विकास क्रांतीकारक असून, यामुळे अमुलाग्र बदल घडू शकणार असल्याची आशा राष्ट्रीय न्यायाग्रह आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर अ‍ॅड.गवळी, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम, प्रकाश थोरात, ओम कदम, सखुबाई बोरगे, हिराबाई ग्यानप्पा यांच्या स्वाक्षर्या आहेत.