Breaking News

निलंगा इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ संघटनेचा विभागीय मेळावा

लातूर, दि. 18 - निलंगा येथील इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ संघटनेचा विभागीय मेळावा रविवार, दिनांक 16 एप्रिल रोजी एस. के. पब्लिक इंग्लिश स्कूल हाडगा रोड, निलंगा येथे पार पडला.
महावितरणमधील सर्व संघटना सोडून या लाईन स्टाफच्या नव्या संघटनेमध्ये जवळपास 100 कामगार सहभागी झाले. या कार्यक्रमात निलंगा विभागीय कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विष्णू स्वरुप पाटील तर प्रमुख वक्ते म्हणून संघटनेचे उपाधक्ष बी. एम. गुराले, केंद्रीय सदस्य मोहिन शेख, डी. डी. पवार, विष्णू इंगळे, खडवे, टयपलवार, भांगे उपस्थित होते. तत्पूर्वी उपास्थितांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यकारिणीत अध्यक्षपदी सय्यद लाला शमीर औसा, उपाध्यक्ष म्हणून शिवाजी संभाजी ताकीपामलवार निलंगा, सरडे आविनाश प्रभाकर, किल्लारी, सचिव सच्चिदानंद केशव पुरी निलंगा, सहसचिव मोरे हणमंत रामदास किल्लारी, सहसचिव विशाल वामनराव गायकवाड निलंगा, संघटक तावडे, बाबू बळीराम पानचिंचोली, बालाजी पन्नमवर, बी. एम. राऊत औसा यांची निवड करण्यात आली.