Breaking News

लाऊडस्पीकर वरून होणार्‍या आजान विषयी वाईट भूमिका मांडल्याबद्दल सोनू निगमच्या पुतळयाचे नेवाशात दहन

अहमदनगर, दि. 23 - मस्जिदी वरून लाऊडस्पिकर द्वारे  होणार्‍या अजान विषयी वाईट भूमिका मांडल्याबद्दल नेवासा येथील श्रीरामपुर रोडवरील खोलेश्‍वर मंदिर चौका समोर मुस्लिम समाजाच्या वतीने गायक सोनू निगम च्या पुतळयाचे दहन करण्यात घोषणा देत निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या
यावेळी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व कॉग्रेस कमिटीचे अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष मौलाना जाकिरभाई शेख यांनी केले. आंदोलनात मुस्लीम समाजातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.गायक सोनू निगम याने मस्जिद,मंदिर व गुरुद्वारा वरील लाऊडस्पीकर बाबद चुकीचे वक्तव्य नुकतेच केले होते याचा  जाहीर निषेध करून नेवासा शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने सोनू निगम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सोनू निगम हे कुप्रसिद्ध गायक असून त्यांनी मस्जिद,मंदिर व गुरुद्वारा वरील लाऊडस्पीकर बाबद चुकीचे वक्तव्य करून समाज्यात विष पेरण्याचे काम केले आहे.ही घटना भारताच्या इतिहासात काळिमा फासणारी आहे. या वक्तव्याने मुस्लिम समाज्याच्या भावना दुखावल्या असून अशा पाश्‍चिमात्य संस्कृती जपणार्‍या सोनू निगम चा जाहीर निषेध करत आहोत
पोलीस निरीक्षकांना यावेळी निवेदन देण्यात आले निवेदनावर मौलाना जाकीरभाई शेख,एजाज पटेल,इम्रानभाई दारूवाले,हारून जहागीरदार,सुलेमान मनियार,जावेद बागवान,सद्दाम सय्यद,कलिम सय्यद, सचिन बनसोडे,शहादाब पठाण,एजाज शेख टेलर, नसीरुद्दीन पटेल,समीर सय्यद,आयुब शेख,शोएब पठाण, फैजान शेख यांच्या सह्या आहेत.