Breaking News

मानवाधिकार असोसिएटच्या जिल्हा सरचिटणीस पदी आदिक खैरे यांची निवड

अहमदनगर, दि. 23 - राहुरी शहरातील सामाजिक कार्यकर्ते आदिक खैरे यांची मानवाधिकार असोसिएटच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याने तालूक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आदिक शंकरराव खैरे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून समाजात एक वेगळाच ठसा उमटवला आहे. राहुरी शहरातील मानाचा गणपती असलेल्या आझाद मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक कार्य करण्यास ते कायम तत्पर असतात. 19 एप्रिल रोजी भूमाता तृप्ती देसाई यांनी दारूमुक्त महाराष्ट्र या आंदोलनाच्या माध्यमातून राहुरी शहरातून भव्य अशी मोटरसायकल रॅली काढून नागरीकांमध्ये जनजागृती केली. या कार्यक्रमात आदिक खैरे यांचे कार्य कौतूकास्पद ठरले. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटचे संस्थापक अध्यक्ष विक्रांत वाकचौरे, राष्ट्रीय सचिव गणेश वाकचौरे, राष्ट्रीय प्रवक्ता सतिष खर्डे, प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय मकासरे व जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोरकर यांनी खैरी यांची मानवाधिकार असोसिएटच्या जिल्हा सरचिटणीस पदी नेमणूक केली.
यावेळी भूमाता तृप्ती देसाई, राहुरी नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपूरे, शशिकांत औटी, प्रशांत मुर्तडकर, दिपक बोरकर, पप्पू कोरडे, प्रकाश शेलार, संजय धनवटे, गणेश खैरे, भाऊ सत्रे, प्रशांत खैरे, संपत गुंजाळ, विष्णू गुंजाळ, दिलीप गुंजाळ आदि उपस्थित होते. आदिक खैरे हे मानवाधिकार असोसिएटच्या माध्यमातून कौतुकास्पद कार्य करतील. असा विश्‍वास जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोरकर यांनी व्यक्त करून लवकरच वरीष्टांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे बोरकर यांनी सांगितले.