Breaking News

धांदरफळ गटातील शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांच्यावतीने सौ. रचना मालपाणी यांचा ऋणनिर्देश सोहळा

संगमनेर (प्रतिनिधी), दि. 29 - मालपाणी परिवाराच्या माध्यमातून संगमनेर व परिसरात नेहमीच सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणार्‍या इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या अध्यक्षा सौ. रचना मालपाणी यांचा धांदरफळ केंद्रातील 15 शाळांच्या शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने ऋणनिर्देश व कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. 
सौ. रचना मालपाणी यांनी इनरव्हील क्लब या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक तब्बल 15 शाळांचे पालकत्व स्वीकारले. त्याअंतर्गत प्रत्येक शाळेला डिजिटल क्लासरुम, लायब्ररी, वॉटर प्युरिफायर, खेळाचे साहित्य तसेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दप्तर व शूज इत्यादी वस्तूंचे मोफत वाटप केले. त्यामुळे शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी मदत झाली आहे. यामुळेच आमच्या धांदरफळ केंद्रातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक व सामाजिक गुणवत्ता वाढण्यास नक्कीच मदत झाली आहे. इनरव्हीलच्या माध्यमातून सौ.रचना मालपाणी यांनी धांदरफळ केंद्राचा शैक्षणिक क्षेत्रात कायापालटच केला आहे.
सौ. मालपाणी यांच्या कल्पक, सक्षम आणि संवेदनशील अशा नेतृत्वामुळे धांदरफळ गटातील सर्व 15 शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सामाजिक दर्जा उंचावण्यास मोलाची मदत झाली असल्याचे मत येथील शिक्षक व ग्रामस्थांनी व्यक्त केले. दिनांक 25 एप्रिल रोजी जवळेकडलग गावातील आढळेश्‍वर आश्रमात आयोजित केलेल्या या ऋणनिर्देश सोहळ्यासाठी क्लबच्या अध्यक्षा सौ. रचना मालपाणी, सेक्रेटरी डॉ.दीप्ती राजूस्कर, सौ.ज्योती पलोड, सौ. राधिका सोमाणी इनरव्हील क्लबच्या सदस्या, पंचायत समिती सदस्य शिवाजी रहाटळ, जवळेकडलगचे सरपंच कैलास अण्णा देशमुख, उपसरपंच गिरीश सुर्वे, शिक्षणप्रेमी भास्कर शेळके, हरिष कडलग, केंद्रप्रमुख सौ.मिनाक्षी पेंडभाजे, 15 शाळांतील शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मोहिते सर, सूत्रसंचलन अनाप सर व काळे सर यांनी केले तर आभार प्रशांत भंडारी सर यांनी मानले.