Breaking News

अजित पवार यांनी केली संगमनेरच्या नविन साखर कारखान्याची पाहणी

संगमनेर (प्रतिनिधी), दि. 29 - राज्यात सर्वत्र सहकार मोडीत निघत असतांना संगमनेर तालुक्याचा सहकार मात्र राज्याला दिशादर्शक ठरला आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी उभ्या केलेल्या विविध सहकारी संस्था माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात े यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थीरित्या सुरु असून येथील सहकार राज्यात आदर्शवत असल्याचे गौरोदगार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहे.
दौर्‍यावर असतांना अजित पवार यांनी थोरात कारखान्यास भेट दिली. यावेळी समवेत कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. माधवराव कानवडे, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष सिताराम गायकर , कपिल पवार , कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, थोरात कारखान्याचा 5 हजार मे.टन व 32 मेगावॅट वीज निर्मीती प्रकल्प हा इतरांसाठी पथदर्शी आहे. या प्रकल्पामुळे वेळेची व आर्थिक बचत होणार असून मोठा पायंडा निर्माण झाला आहे. सहकार ही विकासाची पंढरी असून यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक क्रांती झाली आहे. गोरगरिबांच्या विकासाचा राजमार्ग असलेल्या सहकार चळवळीतून येथे मोठे अर्थिक परिवर्तन झाले आहे. संगमनेर तालुक्यात विविध सहकारी संस्था माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात व आ.डॉ. सुधीर तांबे यांचे मार्गदर्शनाखाली आदर्शवत सुरु असून येथील सहकारी संस्थांनी राज्यात एक वेगळा मापदंड निर्माण केला आहे. सध्या सर्वत्र सहकार मोडीत निघत असतांना येथील सहकार मात्र सुरळीतरित्या सुरु आहे. येथील संस्थांचे आदर्शवत नियोजन, पारदर्शकता, काटकसर, कडवी शिस्त यांच्या जोरावर या संस्था विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे जिवन सुखकर झाले आहे. नव्याने सुरु करण्यात आलेला अद्यमावत साखर कारखान्यामुळे या कारखान्याच्या आर्थिक विकासाला आणखी गती मिळणार असल्याचेही ते म्हणाले.