Breaking News

पंकजा मुंडेंच्या मंत्रालयातील कार्यालयात तृतीयपंथीयांचं आंदोलन

मुंबई, दि. 16 - तृतीयपंथीयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडेंच्या मंत्रालयातील कार्यालयात आंदोलन करण्यात आलं. गेल्या तीन वर्षापासून राज्य सरकारने तृतीयपंथीयांसाठी महामंडळाची स्थापना केली नसल्यानं थेट पंकजा मुंडे यांचे कार्यालय गाठत तृतीयपंथीयांनी तिथे निदर्शने केली.
काँग्रेस सरकारने या संबंधीचा जीआर पास केल्यानंतरही भाजप सरकारने महामंडळ बनवलं नसल्याने ततृतीयपंथीयांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. असं दावा आंदोलक तृतीयपंथीयांनी केला. गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करूनही मदत होत नसल्याने आज त्रस्त झालेल्या तृतीयपंथीयांनी मंत्रालयातील कार्यालयात निदर्शने केली.