अंबाडी प्रकल्पातून अवैध पाणी उपसा
औरंगाबाद, दि. 18 - तालुक्यातील अंबाडी प्रकल्पातील पाण्याचा परिसरातील शेतकर्यांकडून मोठया प्रमाणावर अवैध उपसा केला जात आहे. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षपणामुळे हा प्रकार सुरू असून याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या प्रकल्पावर कन्नड शहर, आंधनेर, तेलवाडीसह आदी गावांच्या पिण्याच्या पाण्याची मदार असून बारामती अग्रो कारखानालाही याच प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येतो. सध्या या प्रकल्पात केवळ तीस टक्केच पाणीसाठा असून त्यातही प्रकल्पा शेजारील राहणार्या शेतकर्यांकडून मोठया प्रमाणावर पाण्याचा उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केले आहे. प्रकल्पातून सध्या वीसच्या जवळपास विद्युत पंपाद्वारे अवैध पाणी उपसा केला जात असून यासाठी महावितरणच्या विजेची चोरी केली जात आहे. मागील दोन वर्षापासून तालुक्यात दुष्काळ परिस्थिती असल्याने अंबाडी प्रकल्प कोरडाठाक झाला होता, मात्र यावर्षी वरील भागात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्प पूर्ण भरला होता .पाटबंधारे विभागाच्या अधिकारी कर्मचारी वर्गाने पंधरा किलोमीटर लांबीचा कालवा तेरा ठिकाणी लिकेज असताना सुध्दा पाणी सोडून आर्धा प्रकल्प रिकामा केला आहे. शहराच्या चाळीस हजार लोकसंख्येचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न या प्रकल्पावर अवलंबून आहे. मागील वर्षी पाणी नसल्याने शहरवासियांचे मोठे हाल झाले होते. जून महिन्यात वेळेवर पाऊस पडला नाही तर पुन्हा शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाटबंधारे विभागाने याविषयी तातडीने उपाययोजना करून पाण्याचा उपसा थांबविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पाणीउपसा वेळीच न थांबविल्यास पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.