Breaking News

घरफोडीसह मोबाईल चोरीचा सपाटा भुरट्या चोरट्यांमुळे नागरिक हैराण

औरंगाबाद, दि. 18 - घरात कोणीच नसल्याची संधी साधत चोरट्यांनी शहरातील विविध भागातील घरे फोडली. तर अन्य ठिकाणांहून घरातील मोबाईल, बॅग चोरून नेले. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सीमा सुनील इंगळे (रा. हिनानगर) या शुक्रवारी (रा. 14) गच्चीवर झोपल्या होत्या. चोरट्यांनी संधी साधून घरातील 18 हजारांचे दागिने व 1,500 रुपये रोख असा 19 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. एम. सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अनंतकुमार अशोकराव पाटील (रा. नूतन कॉलनी) हे राहत असलेल्या आनंद भवन हॉस्टेल रूम नंबर 23 मध्ये शुक्रवारी (दि.14) चोरट्यांनी प्रवेश करून 32 हजार 999 रुपयांचे चार मोबाईल चोरून नेले. क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हवालदार कुर्हाडे करीत आहेत.  जिहाद फय्याज अन्सारी (रा. मोतीकारंजा) यांचा चाजिर्ंगला लावलेला 7 हजार 500 रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला. क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक फौजदार एजाज तपास करीत आहेत.