फेडररचं यशस्वी पुनरागमन, मियामी ओपनमध्ये नदालवर मात
मियामी, दि. 04 - रॉजर फेडररनं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या राफेल नदालचा 6-3, 6-4 असा पराभव करून, मियामी ओपनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. पस्तीस वर्षांच्या फेडररनं दुखापतीतून सावरण्यासाठी सहा महिन्यांची विश्रांती घेऊन आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये केलेलं पुनरागमन कमालीचं यशस्वी ठरलं आहे. त्यानं ऑस्ट्रेलियन ओपनपाठोपाठ इंडियन वेल्स आणि मियामी ओपनचंही विजेतेपद पटकावलं.
विशेष म्हणजे या तिन्ही स्पर्धांमध्ये फेडररनं नदालला धूळ चारण्याचा पराक्रम गाजवला. त्यामुळं नदालविरुद्धच्या लागोपाठ चार सामन्यांमध्ये आता फेडररच्या नावावर विजय जमा झाला आहे. नजिकच्या काळात फ्रेन्च ओपन जिंकणं हे फेडररचं मुख्य लक्ष्य असून, त्यासाठी त्यानं पुढचे दोन महिने विश्रांती घेण्याचं नक्की केलं आहे.