अभिनेत्री दीपिका पादुकोणचं ऋषिकेशमध्ये गंगापूजन
देहरादून, दि. 04 - अभिनेत्री दीपिका पादुकोणनं काल उत्तराखंडमधील ऋषिकेशच्या घाटावर गंगाआरती केली. यावेळी दीपिकाचे कुटुंबियही उपस्थित होते. पांढरा कुर्ता आणि शाल परिधान केलेल्या दिपिकानं गंगाघाटावर पूजाअर्चाही केली.
दीपिका सुट्टीनिमित्त ऋषिकेशमध्ये आली होती. काल संध्याकाळी तिने सहकुटुंब भगवान शंकराचं दर्शन घेऊन, संध्याकाळच्या गंगा आरतीमध्ये सहभाग घेतला. परमार्थ निकेतनचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती महाराज आणि साध्वी भगवती यांच्यासोबत तिने धार्मिक पद्धतीनं गंगापूजन केलं
यावेळी दीपिकाला पाहण्यासाठी ऋषिकेशच्या घाटावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गंगापूजनाच्या कार्यक्रमानंतर दीपिकानं गंगा नदी आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचं आवाहनही उपस्थीतांना केलं. सध्या दीपिकाच्या पद्मावती सिनेमाच्या शूटिंगला अनेक ठिकाणी विरोध होत आहे. जयपूरमधील शूटिंगवेळी सेटवर मारहाण झाली होती. त्यानंतर कोल्हापूरमधील ही पद्मावती सिनेमाचा सेट काही संस्कृतिक रक्षकांनी जाळला होता. या सर्व घटनांनंतर सिनेमात पद्मावतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनेही ट्विटरवर प्रतिक्रिया नोंदवून दु:ख व्यक्त केलं होतं.