Breaking News

अहमदनगर जिल्हा रिक्षा पंचायतच्या तारकपूर येथील रिक्षा स्टॉपचे उद्घाटन

अहमदनगर, दि. 23 - तारकपूर येथील बस स्टॅण्ड व हॉस्पिटलच्या ठिकाणी अहमदनगर जिल्हा रिक्षा पंचायतच्या रिक्षा स्टॉपचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष वैभव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव विजय शेलार, उपाध्यक्ष हमिद देशमुख, डॉ.सानप, डॉ.शीरसाठ, डॉ.जाधव, डॉ.वानखेडे, समीर खान, अशोक शिंदे, निर्मल गायकवाड, अशोक कार्ले, दत्तू चवंडके, उत्तम पाटोळे, ताजोद्दीन मोमीन, शाहू लंगोटे, गुलाम दस्तगीर, सुलतान शेख, राजू आठरे, वाहिद शेख, समीर कुरेशी, फिरोज शेख आदि उपस्थित होते.
हमिद देशमुख यांनी प्रास्ताविकात समितीच्या वतीने चालू असलेल्या कार्याचा आढावा घेतला. पाहुण्यांचे स्वागत नासीर पठाण यांनी केले. वैभव जगताप म्हणाले की, बेरोजगार युवक रिक्षा व्यवसायाद्वारे आपला उदर-निर्वाह चालवत आहे. त्यांना परवाना मिळवून देण्यासाठी कॉ.बाबा आढाव, आ.संग्राम जगताप व सरचिटणीस नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शासनस्तरावर प्रयत्न चालू आहे. रिक्षा चालकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी व त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी रिक्षा पंचायतच्या वतीने नेहमी प्रयत्न चालू असून, प्रवाश्यांना चांगली सेवा देवून, रिक्षा चालक व मालकांनी एकजुटीने सामाजिक कार्यास हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले.
तारकपूर भागातील हॉस्पिटलच्या डॉक्टर मंडळींनी रिक्षा स्टॉपसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी दोन्ही स्टॉपचे सदस्य फिरोज तांबोली, बबन पाटोळे, कय्युम सय्यद, नासीर पठाण, शोएब शेख, वाहिद शेख, जावेद शेख, इरफान शेख, विशाल खांडरे, नवाझ शेख, साजिद शेख, जमशेद भाई, मुनीर शेख, ईस्माइल शेख, राजू सय्यद, समीर शेख आदिंसह रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.