Breaking News

शॅडो मंञालयाचे पाप भुजबळांच्या झोळीत पडले...!

दि. 05, एप्रिल - राजकारणात एखादा नेता प्रभावी ठरू लागला, त्याचा तो प्रभाव प्रस्थापितांना धोबीपछाड देऊ शकतो याचे संकेत मिळू लागले आणि तो प्रभाव स्वकर्तृत्वावर निर्माण झाला की झाडून सारे प्रस्थापित एकञ येऊन नवप्रभावशील नेतृत्वाचे खच्चीकरण करतात.या कामात नेहमीच अग्रेसर असलेले प्रशासनही मोलाचे योगदान देते.अशा प्रभावशील नेतृत्वाकडून कळतनकळत किंबहूना सातत्याने सत्तेच्या छायेत राहून बळावलेला बेडरपणा आणि या बेडरपणाच्या जीवावर आण्णा,दादा,भाऊ,नाना सारख्या गोतावाळ्याने केलेला माज खच्चीकरणाची प्रक्रिया आणखी सुलभ करतो.आर्थरच्या बंद कोठडीत सरकारी पाहुणचार घेत असलेले एकेकाळचे आर्मस्ट्राँग नेतृत्व छगन भुजबळ यांचा प्रवास याच वाटेवरचा आहे....
तब्बल पंधरा हजार कोटींचा गोलमाल करून सार्वजनिक बांधकाम खात्याला भ्रष्टाचाराचे कुरण अशी कुख्याती मिळवून देणारे छगन भुजबळ यांनी सत्तेचा अमर्याद वापर करून सव्वीशे कोटींची अपसंपदा जमा जमा केल्याचा आरोप होत आहे.या आरोपात तथ्यांश किती हा आपला विषय नाही. तपासयंञणा त्यांचे काम करील. माञ एकटे भुजबळ हे धाडस करू शकले हाच खरा संशयाचा मुद्दा आहे.
छगन भुजबळ यांना वर्षभर काळ कोठडीत बंद करण्यास कारणीभूत ठरलेले हे प्रकरण वाटते तितके सरळ नाही. या प्रकरणा अनेक कंगोरे आहेत. अनेकांचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे. अनेकांनी या प्रकरणाशी संबंधीत अनेक गोष्टी जाणीवपुर्वक असंयूक्तिकरित्या अंतर्भूत केल्या आहेत, त्या बाबी कुठल्या त्याचा उहापोह मालिकेच्या ओघाने वेळोवेळी होईल. तुर्तास महाराष्ट्रातील हे एकमेव गंभीर प्रकरण आहे असा आभास निर्माण करून भुजबळांच्या गळ्याला कारवाईची मफरल आवळण्याचा अट्टाहास का केला जातो आहे.? कुणाला काय साध्य करायचे आहे? हे प्रश्‍न निकाली निघणे महत्वाचे आहे.
छगन भुजबळ यांच्या भायखळा शाखा प्रमुख ते महापौर,गृहमंञी,सार्वजनिक बांधकाम मंञी उपमुख्यमंञी इतकेच नाहीतर देशभरातील भटके विमुक्त ओबीसींचा तारणहार म्हणून मिळवलेली लोकप्रियता या प्रवासातच उपरोक्त सर्व प्रश्‍नांची उत्तरे दडली आहे.
भायखळ्याच्या एका ठेल्यावर भाजी विकणारं एक पोरगं राजकारणात एव्हढी मजल मारू शकतो हेच मुळी सुधारणावादी कथित पुरोगामी महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या पचनी पडले नाही, त्यातून हा सारा खेळ मांडून तो पध्दतशीरपणे जिंकण्याच्या दृष्टीने व्युहरचना झाली.
याचा अर्थ छगन भुजबळ हे निष्पाप आहेत, निर्दोष आहेत असे अजिबात नाही. भुजबळांनी दाखवलेली सत्तेची मस्ती कारणीभूत आहेच. माञ हे महाराष्ट्रातील एकमेव प्रकरण नाही. यापेक्षाही मोठा भ्रष्टाचार झाला आहे.सुरू आहे. तिथपर्यंत न पोहचणारी मंडळी भुजबळांच्या मागे हात धुवून का लागली अनाकलनीय मुळीच नाही.विशिष्ट हेतूने पछाडलेली मंडळी हे सर्व घडवून आणीत आहेत, तो विशिष्ट हेतू कोणता हे सांगण्याची आवश्यकता नसावी. एक गोष्ट या ठिकाणी नमुद करणे अत्यावश्यक आहे. सत्तेत असतांना भुजबळांनी खरेतर त्यांच्या आप्तस्वकीयांनी दाखविलेली मुजोरी. मंञीपद भुजबळांकडे असले तरी त्यांचे आप्तस्वकीयच मंञीपदाचा रूबाब मिरवत होते. अगदी गृहमंञालयाचा कारभार भुजबळांकडे होता तेंव्हा पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांपासून एखाद्या गल्ली छाप गुंडाला सोडविण्यापर्यंत आप्तस्वकीयांनी उभे केलेले शडो गृहमंञालय वरिष्ठ जेष्ठ पोलीस अधिकार्यांची वंशावळ काढण्यात हशिल मानीत होते. अंगठे बहाद्दर कार्यकर्ते आयपीएस अधिकार्‍याला अर्वाच्च भाषेत आदेश करीत होते, तिच कार्यपध्दती सार्वजनिक बांधकाम खात्यातही अवलंबली गेली. यापैकी कित्येक गोष्टी भुजबळांपर्यंत पोहचतही नव्हत्या. भुजबळांच्या जीवावर या मंडळींनी दाखवलेला माज आणि कमावलेली अपसंपदा भुजबळांविषयी प्रशासनात असंतोष तयार करण्यास निमित्त ठरली आणि जेंव्हा भुजबळांवर वेळ आली तेव्हा तोच असंतोष प्रशासनाकडून सव्याज परत केला जात आहे. अर्थात इथेही पुन्हा भुजबळच दोषी ठरतात.मंञीपदाची जबाबदारी आणि जनहिताशी बांधिलकी विसरून ते दिवट्या आप्तस्वकीयांवर विसंबले म्हणूनच त्यांचा कार्यभार उरकला.

मुंबई शहर इलाखा-उत्तर मुंबईतही तेवीस टक्क्यांचा व्हायरस

शहर इलाखा आणि उत्तर मुंबई साबां मंडळालाही तेवीस टक्के लाच स्वीकारण्याचा व्हायारसने ग्रासल्याची चर्चा आहे .कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके आणि श्रीमती परदेशी यांनी स्वतःसाठी वीस तर प्रकल्प निधी मंजूरीसाठी तीन टक्के दर ठरविल्याची चार्चा आहे.या हिशेबाप्रमाणे शहर इलाखा विभागात तीस कोटी पैकी जवळपास सात कोटी तर उत्तर मुंबईत जवळपास साडे अकरा कोटीचा लाच व्यवहार झाल्याची वाच्यता आहे. या संदर्भात तपशिलवार दखल उद्यापासून...