Breaking News

सरपंच ग्रामसेवक विकल्या जाणार नाही याची काळजी घेतली तरच दारुबंदी शक्य

बुलडाणा, दि. 26 - सरपंच आणि ग्रामसेवक पैसे घेवून दारु दुकानाला मान्यता देणारा ठराव पारीत करु शकता करीता सर्वांनी दक्ष राहून 1 मे च्या ग्रामसभेत दारुबंदीचे ठराव पारीत करुन घ्यावे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये रोडला लागून असलेली दारुची दुकाने 500 मीटर अंतरावर नेण्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर झाल्यामुळे मद्यविक्रेत्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला करीता मातृतीर्थ बुलडाणा जिल्हा दारुबंदी अभीयानाच्या वतीने 23 एप्रिलला नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोगत व्यक्त करतांना अ‍ॅड.रोठेंनी उपरोक्त विचार व्यक्त केले.
वर्तमानस्थितीत शेतकरी आत्महत्या करीत असतांना, उपासमारी, बेरोजगारी असे अठरा विश्‍व दारीद्ˆय ग्रामीण भागात असतांना दारुचे दुकान म्हणजे संपूर्ण परीवाराची जीवंतपणी आत्महत्या होय. असा सुर यावेळी सभेला उपस्थीत मान्यवर कॉमे्रड सुधिर देशमुख, शाहीर खांडेभराड, सतीश पाटील, सोपान बिचारे, सुरेशाताई निकाळजे या सर्वांच्या मनोगतातुन निघाला.
बैठकीला बुलडाणा जिल्ह्यातील दारुबंदी अभियानाचे सर्वश्री सभासद संदिप काकडे, शाहीर जयवंतराव गवई, योगेश कोकाटे, सुदाम हिवाळे, शाहीर प्रमादे दांडगे, शाहीर इंगळे, सौ.पद्मा जवरे, सौ.रेखा खरात, अमोल चव्हाण, विनोद धंदरे, उषा लहाने, सुलोचना हसले, शोभा बिचारे, मनोरमा डोके, प्रमिला सुशिल, गोकुळाबाई भातोकार शिला इंगळे, रंजना सपकाळ, अजय जाधव, संजय मोरे, रवि भोंडे, जनार्धन झांबरे, वासुदेव जवरे, अनुराधा भावसार, अकिलशहा, सावित्रीबाई मांडवगडे, हेमलता कांबळे, एस.बी.रुपने, नलिनीताई उन्हाळे, यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सभेचे संचालन साहित्यीक अजय जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन सतिषपाटील यांनी मानले. यावेळी दारूमुळे मरण पावलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना सामुहिक श्रध्दांजली अर्पण करुन राष्ट्रगिताने सभेची सांगता करण्यात आली.