Breaking News

एकाच रात्री 3 ठिकाणी चोरी... सराईत बाल गुन्हेगार चोरी करतांना सीसीटीव्हीत कैद

बुलडाणा, दि. 26 - शहरातील बस स्थानक परिसरात 3 ते 4 दुकानांचे शटर वाकऊन चोरी करणार्‍या एका 15 वर्षीय बाल गुन्हेगारास सीसीटीव्हीच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे.
या बाबत शिवाजी सावंत रा. शेलुद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि 25 एप्रिल रोजी सकाळी नेहमीप्रमाणे आपले बस स्टँण्ड रोड वरील गॅरेज चे दुकान उघडले असता  दुकानातील समान अस्ताव्यस्त पडलेले दिसले  तसेच दुकानच्या पाठीमागील शटर एका बाजूने उचकटलेले दिसून आले. त्यावळी दुकानाची पाहणी केली असता अपे रिक्शाचा दोन बटरी किंमत 8000 रु., दोन सेल किमत अंदाजे 10000 रु व एक गस सिलेंडर   असा एकूण 20000 रु किमतीचा माल चोरून नेल्याचे दिसले. त्यावेळी आजूबाजूला शोध घेतला असता शिवाजी महाराज चौकातील प्रह्लाद कर्‍हाडे यांचे व बाबूसिंग राजपुरोहित यांचे दुकानचे शटर वाकुउन  त्याचे गल्ल्यातील चील्लर व नगदी तसेच मोबाईल फोन चोरून नेल्याचे समजले.
इतकेच नव्हे तर राजपुरोहित यांचे स्वीट मर्त मधील सीसीटीव्ही कॅमेराची तोडफोड केली तर कर्‍हाडे यांचे राधा टी हाउस मधील सीसीटीव्ही चे 2 कॅमेरे काढून टेबल वर ठेवले मात्र हॉटेल मधील 3 रा कॅमेरा तो काढू न शकल्यामुळे त्याचे हे सर्व कारनामे या कॅमेरामध्ये कैद झाले. विशेष म्हणजे सीसीटीव्ही द्वारे होणारे चित्रीकरण साठवण्यासाठी असलेल्या डी.व्ही.आर.( डीजीटल व्हिडीओ रेकॉर्डर ) हे उपकरण देखील चोरण्याचा त्याने प्रयत्न केला. याचा अर्थ अल्पवयीन असला तरी  त्याला या नवीन तंत्रज्ञानाबाबत संपूर्ण माहिती असली पाहिजे. तर अंदाजे एक वीट जाऊ शकेल इतकेच शटर वाकविण्यात आले होते.
या बाल गुन्हेगाराबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शहरातील यापूर्वी घडलेल्या अनेक चोर्यामध्ये याचा हाथ असून बाल गुन्हेगार असल्यामुळे तो कायद्याच्या कचाट्यातून सुटतो .