यमुना नदीला झालेल्या नुकसानाला राष्ट्रीय हरित लवाद जबाबदार - श्री श्री रवीशंकर
नवी दिल्ली, दि. 19 - जागतिक संस्कृती महोत्सवामुळे यमुना नदीला झालेल्या नुकसानाला केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि राष्ट्रीय हरित लवाद जबाबदार असल्याचे वक्तव्य आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांनी केले. या महोत्सवाला केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारासह राष्ट्रीय हरित लवादाने परवानगी दिली होती.11 मार्च 2016 मध्ये जागतिक संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय महोत्सवासाठी हरित लवादाने परवानगी दिली होती. या महोत्सवामुळे यमुना नदीच्या पात्राचे नुकसान झाले होते. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगवर जोरदार टीका झाली होती.
