Breaking News

केजरीवाल सरकारचे सलग तिसर्‍या वर्षी ‘टॅक्स फ्री’ बजेट

नवी दिल्ली, दि. 09 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनोखी हॅट्ट्रिक साधली आहे. केजरीवाल सरकारने 2017-18 या आर्थिक वर्षासाठी बजेट सादर केलं. दिल्लीचा हा सलग तिसरा बजेट आहे, जो ‘टॅक्स फ्री’ आहे. म्हणजेच कोणतेही नवे टॅक्स लावण्यात आले नाहीत किंवा सध्याच्या टॅक्समध्ये वाढ करण्यात आलेली नाही.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी 48 हजार कोटी रुपयांचा बजेट विधानसभेत सादर केला. या बजेटमध्ये योजनांवरील खर्च मांडण्याची परंपरा मोडीत  काढत महसुली खर्च आणि भांडवली खर्च अशा स्वरुपाचा बजेट तयार करण्यात आला. सिसोदिया यांच्या म्हणण्यानुसार, नव्या बदलामुळे दर तीन महिन्यांनी  आता सादर करण्यात आलेल्या बजेटचं समीक्षण करता येईल आणि खर्चाचं मुल्यांकनही केलं जाऊ शकतं.