Breaking News

नेवासा शहराचा विकासासाठी भष्ट्राचारी गडाखांना रोखा-आ.मुरकुटे

नेवासा, दि. 30 - भ्रष्टाचारी गडाखांना नेवाशात नगर पंचायतच्या माध्यमातून रोखल्याशिवाय नेवाशाचा विकास होणार नाही त्यामुळे नेवासा नगर पंचायती च्या निवडणूकीत गडाखांना रोखा असे आवाहन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासकर जनतेला केले आहे.
नगर पंचायतीसाठी भाजपच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी गडाखांवर प्रखर टीका केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकरराव ताके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शेवगाव नगर पंचायतीचे नगरसेवक अरुण मुंढे व इतरही नगरसेवक बंधू उपस्थित होते. मळगंगा मंदिरामध्ये नारळ फोडून व कार्यालयाचे फीत कापून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले.
आपल्या आक्रमक भाषणात बाळासाहेब मुरकुटे म्हणाले कि, गेले 60 वर्षे गडाख कंपनी राजकारणाच्या माध्यमातून नेवासा तालुक्यावर राज्य करीत आहे. परंतु त्यांच्या खालच्या दर्जाच्या विचार संस्कृतीमुळे नेवासा तालुक्याचा विकास झालेला नाही. . लोकप्रतिनिधी या नात्याने नेवासा शहराच्या विकासाचे दायित्व मी स्वीकारले आहे. तालुक्याचा केंद्रबिंदू असलेल्या नेवाशाचा विकास झाला तर संपूर्ण तालुक्यात विकासाचे वारे वाहतील परंतु त्यासाठी घराणेशाहीला व दडपशाहीला झुगारून देत गडाखांच्या विरोधी भाजपला मतदान करा.दिल्ली ते गल्ली भाजपची सत्ता असल्यास विकासाला भरपूर निधी प्राप्त होईल.
गडाखांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ 85 लाख रुपये दिले होते. आम्ही निवडणुकी आधीच 8 कोटी रुपये आणले आहेत. गडाखांवर टीका करतांना ते म्हणाले कि,  गडाखांची लढाई घुलेंशी,विखें शी अथवा मुरकुटेशी असली तरी विजय मात्र भाजप चाच होईल हे मात्र निश्‍चित आहे त्यांच्या वाईट प्रवृत्तील याच ठिकाणी ठेचावे लागेल. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्यांनी कमावलेली संपत्ती त्यात अण्णाभाऊ साठे व सहकारी बँक घोटाळा या प्रकरणाच्या चौकशा पूर्ण होत आल्या असून लवकरच पिता-पुत्र गजाआड दिसतील असे आवाहन बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.
यावेळी अशोकराव डहाळे,अ‍ॅड विश्‍वास काळे, दिलीप मोटे,डॉ लक्ष्मण खंडाळे, कृष्णा डहाळे, शहराध्यक्ष पोपट जिरे,  दत्तूभाऊ काळे, य अजित मुरकुटे, दत्तात्रय काळे, कृष्णा परदेशी, अ‍ॅड स्वप्नील  साखरे  मुक्तार शेख, राजेंद्र  मुत्था,प्रकाश गुजराथी,भास्कर कनगरे  सुभाष पल्लोड,राजु मापारी, अरविंद  मापारी, दिनेश व्यवहारे,ईस्माईल जहागीरदार, एकनाथ  भगत, राजेंद्र पिंपळे  आदी मान्यवर हजर होते.