Breaking News

एस बालन ग्रुप पुणे आत्मा मालिक महिला चषकाचा मानकरी

कोपरगाव, दि. 30 - आत्मा मालिक क्रिकेट अकादमी आयोजित ऑल इंडिया महिला क्रिकेट स्पर्धेत पुण्याचा एस.बालन ग्रुप संघ विजयी ठरला. या स्पर्धा 22 ते 28 एप्रिल दरम्यान आत्मा मालिकच्या लॉन अच्छिदीत दोन मैदानावर खेळविल्या गेल्या. या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता. यात डब्ल्यु एस.ए. अकॅडमी, पुणे व एस.बालन गु्रप पुणे यांच्यात पहिला उपात्य सामना झाला. तर अमृतसर पंजाब व ठाणे स्पोर्ट वेलफेअर असोसिएशन यांच्या दुसरा उपात्य सामना खेळला गेला. या एस.बालन गु्रप व ठाणे वेलफर संघ विजेते होवून या दोन संघात अंतिम सामना खेळविला गेला. निर्धारित 20 षटकात प्रथम फलदाजी करतांना ठाणे वेलफेअर संघ 18.5 षटकात 57 धावांवर बाद झाला. 58 धावांचे लक्ष एस.बालन ग्रुप संघाने 15 षटकात एका गडयाच्या मोबदल्यात पार करून चषकावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण धुळे जिल्हयाचे जिल्हाक्रिडाधिकारी रवि नाईक यांचे शुभहस्ते झाले. विजेत्या संघास रक्कम रूपये 21,000/- रोख व चषक, उपविजेत्या संघास 11,000/- रोख व चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेत पुण्याची तेजल हिस सर्वकृष्ट फलंदाज महिला, मुक्ता मगरे हिला मालिकावीर तसेच ठाण्याच्या पुनम खेमनर हिस सर्वकृष्ट गोंलदाज म्हणून गौरविण्यात आले. रवि नाईक यांचे हस्ते भारतीय अष्टपैलू खेळाडू अनुजा पाटील हिचा विशेष गौरव करण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्या सोबत त्याची पत्नी सिमाली नाईक तसेच सोनाली मिर्त्सी हे देखील उपस्थित होते. या स्पर्धेत प्रदिप पाटील, अमोल गायकवाड, राजु काळे, मयुर डोखे, आकाश शिंदे, मंगेश गायकवाड यांनी पंच म्हणून काम पाहिले. तर स्पर्धा यशस्वीतेसाठी निलम पाटील, संदिप बोळीज यांनी परिश्रम घेतले.