अखेर ईशांत शर्माला खरेदीदार मिळाला!
मुंबई, दि. 04 - बंगळुरुमध्ये 20 फेब्रुवारी रोजी आयपीएल 10 च्या लिलावात ईशांत शर्माला बोली न लागल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण भारत आणि ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणार्या या मध्यमगती गोलंदाजाला अखेर खेरदीदार मिळाला आहे. ग्लेन मॅक्सवेल कर्णधार असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची ईशांत शर्मासोबतची चर्चा झाली आहे. पंजाबचा संघ ईशांतला दोन कोटी रुपयांत खरेदी करण्यास तयार आहे. सर्व अंतिम टप्प्यात आहे. आता केवळ करार होणं शिल्लक आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, किंग्ज इलेव्हन पंजाबच्या महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत झाली आहे. त्याची भरपाई म्हणून फ्रॅन्चाईजीने ईशांत शर्माशी संपर्क साधला आणि दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
सध्या किंग्ज इलेवन पंजाबचा संघ मुख्य प्रशिक्षक वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्त्वात इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये सराव करत आहे. किंग्ज इलेवन पंजाबमध्ये एकूण 27 खेळाडू असून त्यात 18 भारतीय आणि 9 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएल लिलावात ईशांत शर्मा आणि इरफान पठाणला कोणत्याही संघाने खरेदी केलं नव्हतं. या दोन्हीं खेळाडूंनी मागच्या मोसमात रायझिंग पुणे सुपरजायंट्सचं नेतृत्त्व केलं होतं. ईशांत शर्मा पुण्याकडून केवळ दोनच सामन्यात खेळला होता. दुखापतीनंतर तो पुढील सामने खेळू शकला नव्हता. यानंतरही त्याने स्वत:ची बेस प्राईज दोन कोटी ठेवली होती. परिणामी लिलावात त्याचं मोठं नुकसान झालं होतं.