Breaking News

भुवनेश्‍वरमध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक, पंतप्रधान मोदींचा रोड शो

भुवनेश्‍वर, दि. 16 - भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज ओदिशातल्या भुवनेश्‍वर इथं सुरु आहे. कार्यकारिणीत भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भुवनेश्‍वरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी रोड शो केला.
आपल्या गाडीच्या बाहेर येऊन त्यांनी लोकांना अभिवादन केलं. विशेष म्हणजे चालत्या गाडीवर उभं राहून मोदींनी एक प्रकारे धोकाही पत्करला. काही वेळ तर ते दोन गाड्यांच्यामध्ये उभे राहून लोकांना अभिवादन करत होते. भुवनेश्‍वरमध्ये आज आणि उद्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे. ज्यामध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चर्चा होण्याची शक्यता आहे.
2019साठीचं नवं लक्ष्य म्हणून ओदिशा भाजपच्या रडारवर आहे. ओदिशासह पूर्व किनारपट्टीवरच्या आसपासच्या भागांमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न म्हणून यावेळी भाजपनं त्यांच्या ‘लूक इस्ट पॉलिसीअंतर्ग’ओदिशाची निवड केल्याचं समजतं आहे. नुकत्याच ओदिशात ज्या स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यात भाजपनं आश्‍चर्यकारकरित्या यश मिळवलं आहे. काँग्रेसला मागे टाकत ओदिशातला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप पुढे येत आहे. त्यामुळे 2019ला बिजू जनता दलाला कडवं आव्हान देण्याच्या प्रयत्नात भाजप आहे.