Breaking News

पेट्रोल आणि डिझेल महागलं, नवे दर आजपासून लागू

मुंबई, दि. 16 - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय तेलकंपन्यांनी घेतला आहे. पेट्रोल प्रतीलिटर 1.39 रुपये तर डिझेल 1.04 रुपयांनी महाग झालं आहे. आजपासून  हे नवे दर लागू झाले आहेत. यापूर्वी 1 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली होती. पेट्रोल प्रतीलिटर 3.77 रुपये तर डिझेल प्रतीलिटर 2.91 रुपयांनी स्वस्त झालं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते.
दरम्यान, सोने-चांदी दराप्रमाणे यापुढे आता दररोज पेट्रोल-डिझेलचेही दर ठरणार आहेत. 1 मेपासून सुरुवातील 5 शहरांत दररोज पेट्रोल-डिझेलचे दर पाहायला मिळतील. पाच शहरांमध्ये पाँडेचरी, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), उदयपूर (राजस्थान), जमशेदपूर (झारखंड) आणि चंदीगढ यांचा समावेश आहे. दैनंदिन इंधन दराचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास, देशभरात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.