Breaking News

शिंक्षकांनी ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे-खेडकर

अहमदनगर, दि. 26 - नविन पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांनी कर्तव्य भावनेपेक्षा मातृत्वाच्या भावनेने पार पाडावी.पंचायत समितीच्या वर्तुळात कोणत्याही प्रकारचे राजकारण शिंक्षकांना त्रास  दायक ठरणार नाही.शिक्षकांनी ग्रामिण भागात गुणवत्ता वाढीवर भर द्यावा.असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जेष्ठ नेते सोमनाथ खेडकर यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील मोहटे येथे केंद्र प्रमुख रामदास सोनवणे व मुख्यधापीका कमल आव्हाड यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रमुख पाहुने म्हणुन जिल्हा परिषद सदस्य अनिक कराळे,व संध्या आठरे,गट शिंक्षणअधिकारी शिवाजी कराड,विस्तार अधिकारी रामनाथ कराड,जेष्ठ नेते अशोक चोरमले,नगराध्यक्ष डॉ.मुत्युजय गर्जे,पंचायत समिती सदस्य सुनिल परदेशी.सरपंच डॉ.हर्षवर्धन पालवे, रविंद्र वायकर,रेणुका विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब दहिफळे,प्रा. माधव लाड,पोपट फुंदे आदि उपस्थीत होते.
खेडकर म्हणाले,जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता अलिकडच्या काळात वाढत आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे मोठे आव्हान समजुन शिक्षकांकडुन वेगळ्या वाटेने जाऊन उपक्रम राबवले जात आहे.तालुक्यातील सर्व शाळा डिजीटल व्हाव्यात यासाठी पंचायत समिती पातळीवरून विशेष प्रयत्न व्हावेत,यासाठी सर्व सदस्यांनी मिळुन धोरणात्मक निर्णय अमलात आणावेत.आगामी काळात जलद गतीने काम करणार आहोत.माध्यमाच्या माध्यमातुन विद्यार्थांशी बोलते राहाण्याबरोबर पालकांशी असलेली जवळीकतेची नाते अधिक मजबुत व्हावेत.सेवा निवृत्त झालेल्या कर्मचार्यांनी आपल्या अनुभवाचा व ज्ञानाचा लाभ सर्व घटकांना मिळावा म्हणुन सेवा भावी पद्धतीने काम करावे.यावेळी विविध वकत्यांनी भाषणे झाली.