Breaking News

चास येथे भैरवनाथ यात्रा उत्साहात

अहमदनगर, दि. 26 - येथील चास (ता, नगर) येथील  ग्रामदैवत  भौरवनाथ  यात्रा उत्साहात  संपन्न  झाली. श्रीक्षेत्र प्रवरा संगम येथून  आणलेल्या कावडींने  भैरवनाथांचा  जलाभिषेक करण्यात आला.  रात्री ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
 दुपारी कुस्त्याचा भव्य हगामा भरवण्यात आला. उपसरपंच पोपट घुंगार्डे व राधाकृष्ण वाळुंज याच्याहस्ते हगाम्याची सुरवात करण्यातआली. यावेळी मल्लांना शंभर रूपयांपासून दहा हजारापर्यंन्त इनाम वाटण्यात आले. युवराज कार्ले व दिपक कार्ले, सुरेश गायकवाड यांनी कुस्त्या लावण्याचे काम पाहिले, तर नवनाथ गोंडाळ, मारूती देवकर, संदिप वाळुंज, सुभाष गवळी यांनी कुस्त्या सोडवण्याचे काम केले. राधाकृष्ण वाळुंज, पोपट घुंगार्डे, ऍड. राजेंद्र गावखरे यांनी इनाम वाटण्याचे काम केले. या हगाम्यासाठी राज्यभरातील मल्लांनी आपली मल्लविद्येतील कसब दाखवत इनाम मिळवले.