Breaking News

उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल कवडे यांचा प्रेस क्लबच्या वतीने गौरव

अहमदनगर, दि. 26 - माध्यमांचा प्रभाव वाढला आहे. प्रबोधनाची परंपरा दृढ व विकसित करण्यासाठी पत्रकारांची भुमिका महत्त्वाची आहे. जिल्ह्यात काम करताना पत्रकारांमध्ये अशा पध्दतीने मिसळलो की, प्रेस क्लब व पत्रकारांच्या कुटुंबीयांचा सदस्य बनलो. प्रेस क्लबच्या विविध उपक्रमात सहभागी होता आले. प्रेस क्लबने जलयुक्तशिवारासाठी आर्थिक मदत देवून, समाजप्रबोधनाबरोबर विकासात्मक कामामध्ये योगदान दिले. समाजकार्याचे व्रत घेवून प्रेस क्लबची वाटचाल सुरु आहे. या जिल्ह्यामध्ये चांगल्या विचाराची व प्रबोधनाची परंपरा असून, अनेक संत महात्म्यांनी याचा पाया रचला आहे. येथे काम करण्याची संधी मिळाली हे गौरवास्पद असून, नगरकरांशी ऋणानुबंध कायम राहणार असल्याची भावना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी व्यक्त केली.  राज्यशासनाचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार अनिल कवडे यांना मिळाल्याबद्दल प्रेस क्लबच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी ते बोलत होते.