Breaking News

राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाळबुधे यांची शहराला भेट

अहमदनगर, दि. 25 - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे यांनी शहरास भेट देवून चालू असलेल्या कार्याचा आढावा घेतला. पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, ओबीसी विभागाचे महासचिव दत्तात्रय राऊत, प्रा.अरविंद शिंदे, अशोक रधूते, अतुल ढोबळे, प्रा.रामदास आढागळे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, सारंग पंधाडे, प्रा.अमोल खाडे, सुरज भिसे, भरत शिरसाठ, दिलदारसिंग बीर आदि उपस्थित होते.दत्तात्रय राऊत यांची ओबीसी विभागाच्या महासचिवदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.