Breaking News

सिटी कोतवाली ते शिवाजी पार्क या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ


अकोला (प्रतिनिधी), दि. 26 - शहरातील रस्त्यांचा अनुशेष व दळणवळणाच्या चांगल्या सोयी सोबत अकोला शहराचे नावलौकिक करण्याच्या दृष्टीने भाजपा सरकार महाराष्ट्रात स्थापना झाल्यापासून विकास पर्वाला गती देण्याचे काम आ. गोवर्धन शर्मा यांनी करून शहरातील प्रमुख रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटकरण व विस्तारीकरण व सुशोभीकरण करून हैदराबाद शहराच्या धर्तीवर एल.ए.डी दिव्यांची व्यवस्था उपलब्ध कखपश्रळपश ळारसश 2रून देण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. या दृष्टीने सिटी कोतवाली ते शिवाजी पार्क या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होऊन हा रस्ता पालखी, गणपती सोबत शहरातील सर्वात मोठे बाजारपेठेला जोडणारा व शहरातील महत्व पूर्ण रस्त्याचे काम सुरु झाले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय ते महानगर पालिका रस्त्याचे विस्तारीकरण दुभाजकासह कामाला गती मिळाली आहे.
सहकार नगर ते तुकाराम चौक पर्यंतच्या कामाला सुद्धा आरंभ होणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय ते सरकारी बगीचा रस्त्याचे कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. तसेच शहरातील प्रमुख नऊ रस्त्यांसाठी 25 कोटी रुपयाचा विशेष निधी मिळवण्यासाठी आ. गोवर्धन शर्मा प्रयत्नशील आहेत.