Breaking News

विश्‍व जागृती मिशनच्या वतीने उल्हास पर्वाचे आयोजन

अकोला (प्रतिनिधी), दि. 26 - जगातील लाखो साधकांचे उध्दारक प पु. आचार्य सुधांशूजी महाराज यांच्या जन्मोत्सवावर महानगरात उल्हास पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.विश्‍व जागृती मिशन अकोल्याच्या वतीने गुरुदेवांच्या जन्मोत्सव उल्हास पर्वाच्या रूपाने साजरा करण्यात येणार आहे.
दि.2 मे रोजी सायंकाळी 6 वा. स्थानीय संत तुकाराम चौक परिसरातील श्री गणेश कृपा मंगल कार्यालयात मिशनचे संरक्षक आ. गोवर्धन शर्मा यांच्या उपस्थितीत तथा मिशनचे आचार्य पु. शिवदत्तजी महाराज यांच्या मार्गदर्शन हे उल्हास पर्व संपन्न होणार आहे.या कार्यक्रमात पु. शिवदत्तजी महाराज यांचे प्रवचन व साधकांद्वारे भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. उल्हास पर्वावर दि. 26 एप्रिल ते 2 मे पर्यंत टेलिकॉम कालोनी ,रिंग रोड परिसरातील आनंद सत्संग निकेतन भवनात इयत्ता 4 ते 10 वी पर्यंतच्या विध्यार्थ्यांसाठी प्रतिभा विकास संस्कार शिबिराचे आयोजनही  करण्यात आले आहे. या शिबिरात विविध विषयांचे तज्ज्ञ व आचार्य शिवदत्तजी मार्गदर्शन करणार आहेत. भवन परिसरात या संस्कार शिबिराची नोंदणी सुरु असून विद्यार्थ्यांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आहवान करण्यात आले आहे.
या उल्हास पर्व सोहळ्यात नागरिक महिला -पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आहवान विश्‍व जागृती मिशन अकोलाचे अध्यक्ष वामनराव लिखारे,  महामंत्री पुरुषोत्तम वानखडे, पदाधिकारी विश्‍वजित सिसोदिया, दत्तात्रय भरणे, सुरेश इमाने, लक्ष्मण म्हेत्रे, रामदास बोरोडे,  पन्नालाल सोमाणी, टीकाराम येसनपुरे, राजकुमार वर्मा, दयाराम टेकाडे, डॉ. अंबादास चुकेवार, रमेश पवार, रामदास गावत्रे, रामलाल अग्रवाल, कमलकिशोर वर्मा, डॉ. वासुदेव शेकार, मनोहरराव खरपकर, रामलाल अग्रवाल, दिगंबर सपकाळ, रामेश्‍वर सुरते, सुधाकर फुलारी, विनायक टेकाडे, वीरेंद्र श्रीवास्तव, नवीन गुप्ता, महादेव कळमकर, वसंतराव भारस्कर, शेषराव धनोकार, लता शिसोदिया, जयश्री लिखारे, मंजू अग्रवाल, शालिनी तरकाडे, रंजना म्हेत्रे, सविता अग्रवाल, अंजली धनोकार समवेत समस्त महिला-पुरुष पदाधिकार्‍यांनी केले.