मेट्रो-3 प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील 33 हेक्टर जागा
मुंबई, दि. 31 - मेट्रो-3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील 33 हेक्टर जागा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी दिली. यापूर्वी आरे कॉलनीमध्ये कारशेड उभारण्यासाठी शिवसेनेने विरोध दर्शवला होता. मात्र शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता आज मुख्यमंत्र्यांकडून कारशेडसाठी परवानगी देण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो-3 साठी आवश्यक ती जागा हस्तांतरीत करण्याचे आदेश मुंबई महानगर पालिकेला दिले आहेत. यासाठी आरे कॉलनीमधील 33 हेक्टर जागा ना बांधकाम क्षेत्रातूनदेखील वगळण्यात आली. कुलाबा-सिप्झ-वांद्रे हा 33 किमीचा पहिला भुयारी मेट्रो प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पामुळे आरे कॉलनीमधील झाडे तोडावी लागणार असणार असून गिरगाव दादर भागातील लोकांचे स्थलांतरण होणार असल्याचा दावा करत शिवसेनेने याला विरोध केला होता. मात्र 2019 पर्यंत ही मेट्रो सुरू करण्याचा भारतीय जनता पक्षाचा मानस आहे. त्यामुळेच तात्पुरत्या स्वरूपात 17 तर कायम स्वरूपी 24 भूखंड मेट्रोसाठी हस्तांतरीत करण्याचे आदेश नगरविकास खात्याने यापूर्वी महानगरपालिकेला दिले आहेत.